🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

पक्ष प्रवेशावरून नेत्याच्या मुलाचा संताप; कार्यक्रमात शाब्दिक चकमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शहरातील एका मध्यमवर्ती राजकीय युवा नेत्याचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एका पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात या नेत्याची अचानक उपस्थिती लक्षवेधी ठरली. काही वेळातच झालेल्या गोंधळाने वातावरण तापले.


 यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित होता आणि त्याकाळात काँग्रेसप्रणीत उमेदवाराचा प्रचार करताना  विरोधकांवर जहरी टीका केली होती. याच मुद्द्यावरून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एक  नेत्याच्या पुत्राने संताप व्यक्त केला आणि “याला का पक्षात घेतलं?” असा थेट सवाल उपस्थित केला.


त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये क्षणिक तणाव निर्माण झाला. शब्दांच्या देवाणघेवाणीने प्रसंग हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गारगोटी येथील प्राचार्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत मधस्थी केली आणि वाद तिथेच थांबवण्यात आला.


यावेळी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात या कार्यकर्त्याने थेट मंचावर येऊन त्यांचा हात धरत आपली निष्ठा दर्शवली. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सार्वजनिकरित्या त्याचे स्वागत करत त्याचे कौतुक केले. काही वेळातच या कार्यकर्त्याच्या पुढाकाराने नवीन सदस्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणीही करण्यात आली.


दरम्यान, कार्यक्रमानंतर दोघेही संबंधित कार्यकर्ते कार्यालयात पुन्हा एकत्र आले. नेत्याच्या पुत्राने पुन्हा एकदा 'याला पक्षात घेतल्याचा निर्णय योग्य आहे का?' असा सवाल उपस्थित केला. यावर गारगोटीतील प्राचार्यांनी “हा नेतृत्त्वाचा आदेश आहे” असे स्पष्ट सांगत वाद मिटवला आणि दोघांनाही शांततेने बाजूला करण्यात आले.


या संपूर्ण घटनेची शहरात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु असून, एका सामान्य कार्यकर्त्याच्या प्रवेशावरून इतका वाद निर्माण होणे हे राजकीय अस्थिरतेचे प्रतीक मानले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण आधीच तापलेले असताना, अशा घटनांमुळे पक्षांतर्गत तणाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.






أحدث أقدم