🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 विचार चांगले असतील तर आयुष्य नक्कीच सुंदर असेल     🔴 कोल्हापूरचे ट्रॅफिक आऊट ऑफ कंट्रोल     🔴 गणरायाच्या आगमनासाठी अवघा देश सजला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

बहिण गेली… पण तिच्याच ‘हाता’ने भावाला बांधली राखी; अवयवदानातून साकारला मानवतेचा अद्वितीय उत्सव

मुंबई : काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असतात. ती हृदयाने, त्यागाने आणि प्रेमाने जुळलेली असतात. ही तशीच एक भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी आहे रिया मिश्री आणि अनमता अहमद यांची.केवळ ९ वर्षांची असताना सप्टेंबर २०२४ मध्ये मेंदूतील रक्तस्रावामुळे रिया मिश्रीचे आयुष्य थांबले. पण तिचा उजवा हात मात्र आजही जिवंत आहे… आणि तो हात आता १६ वर्षीय अनमता अहमदच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.


रिया गेल्यानंतर तिच्या कुटुंबाने एक मोठा आणि हृदयस्पर्शी निर्णय घेतला अवयवदानाचा. तिचं हृदय, दोन्ही किडनी आणि उजवा हात दान करण्यात आला. तोच हात तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील अनमता अहमदला प्रत्यारोपित करण्यात आला. जगातील सर्वात लहान वयातील हात प्रत्यारोपण म्हणून या घटनेची गिनीज बुकमध्ये नोंद झाली.


या कथेतला सर्वात हृदयाला भिडणारा क्षण यावर्षी रक्षाबंधनाला घडला. अनमता खास गोरेगावला रियाच्या कुटुंबाला भेटायला आली. तिने तोच हात  जो कधीकाळी रियाचा होता  पुढे करून रियाच्या मोठ्या भावाला, शिवमला राखी बांधली. त्या क्षणी मिश्री कुटुंबाला जणू रिया पुन्हा त्यांच्या समोर उभी आहे, असं वाटलं. डोळ्यात अश्रू होते, पण मनात अभिमान आणि समाधानाची लहर उसळली.


हा फक्त राखी बांधण्याचा प्रसंग नव्हता, तर तो प्रेम, कृतज्ञता आणि मानवतेचा सण होता. रियाच्या त्यागामुळे अनमताचं आयुष्य बदललं आणि एका बहिणीचं अस्तित्व कायम जिवंत राहिलं.आजही अनेक रुग्ण हात, अवयव किंवा रक्ताच्या प्रतीक्षेत आहेत. जर आपण सर्वांनी अवयवदानाचा संकल्प केला, तर कित्येक घरांमध्ये पुन्हा हसू, आनंद आणि जीवन परत येऊ शकतं.रिया तुझं प्रेम आणि तुझा त्याग कायम जिवंत राहील.अनमता तू दाखवलंस की नातं हे केवळ जन्माने नाही, तर मनाने जुळतं.

थोडे नवीन जरा जुने