कोल्हापूर रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘बंध’ अधिक घट्ट करण्याचा उपक्रम युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीने हाती घेतला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बालकल्याण संकुलात आज सकाळी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमात महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संकुलातील मुलांचे औक्षण करून राख्या बांधल्या आणि त्यांना आशीर्वाद दिला. यानंतर मुलींनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधत भावाच्या नात्याची परंपरा जपली.
कार्यक्रमात खास आकर्षण ठरले ते राजनंदिनी कलेक्शनच्या शर्मिला काटकर यांनी स्वतःच्या हाताने शिवलेल्या पर्सचे वितरण. या पर्स युवासेना पदाधिकाऱ्यांनी लाडक्या बहिणींना भेट देत त्यांच्या सुरक्षिततेची व गरज पडल्यास मदतीची हमी दिली. त्यांच्या या श्रमाचे व प्रेमाचे कौतुक म्हणून संस्थेतर्फे सौ. काटकर यांचा सत्कारही करण्यात आला.
या वेळी शिवसेना महिला आघाडी दक्षिण शहर प्रमुख अमरजा पाटील, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, जिल्हा समन्वयक अविनाश कामते, उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळोखे, जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, युवतीसेना उपशहरप्रमुख वल्लरी वाले, विभागप्रमुख अवधूत घाटगे, शहर सरचिटणीस विपुल भंडारे, उपशहरप्रमुख प्रकाश पाटोळे, शुभम शिंदे, सिद्धेश देसाई, अभिषेक ढेरे, अक्षय पाटील, पिंटू साळोखे, अक्षय घाटगे, अभिषेक मंडलिक, हरी भोसले, भूषण पाटील तसेच शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र उपसमन्वयक सौरभ कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.