🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापुरात वाढतोय प्लास्टिकचा साठा – पर्यावरण आणि आरोग्याच्या संकटाची घंटा

कोल्हापूर -"जिथे नाले, तिथे प्लास्टिक" – ही आता कोल्हापूर शहराची नवीन ओळख झाली आहे का?"शहराच्या गल्लीपासून मोठ्या मुख्य रस्त्यांपर्यंत, कोल्हापूरमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा साठा वाढत चालला आहे.दैनंदिन वापरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल, आणि पॅकिंग मटेरीयल्स हे सगळं अनियंत्रितरीत्या नाल्यांमध्ये, रस्त्यांवर, आणि सार्वजनिक जागांमध्ये दिसत आहे.


🧾 कोल्हापूर महापालिकेचे (KMC) आकडे काय सांगतात?

दररोज सुमारे 150 टन कचरा उचलला जातो

त्यातील 18 ते 25 टन प्लास्टिक कचरा असतो,पण यातील फक्त 30% प्लास्टिकचे पुनर्वापर केला जातो.

कोल्हापूरसारख्या शहरात जिथे महापुराचा वारंवार धोका असतो, तिथे प्लास्टिक साठ्यामुळे:गटारे तुंबतात,नाल्यांचा प्रवाह अडतो,आणि परिणामी रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश स्थिती निर्माण होते,प्लास्टिकमध्ये साचलेलं पाणी म्हणजे:डासांची उत्पत्ती,डेंग्यू, मलेरिया, आणि त्वचारोगांचं वाढलेलं प्रमाण,प्लास्टिक जाळल्यास हवेत घातक वायू (dioxins, furans)

नागरिक अनेकजण प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरतात,व्यापारी प्लास्टिकमध्ये माल पॅक करून विक्री करतात,प्रशासन बंदी असूनही अंमलबजावणीत हलगर्जी,जनजागृती कागदावर जास्त, कृतीत कमी.

प्रशासनाला आता काय करावे लागेल....

1. प्लास्टिक बंदीचं कडक अंमलबजावणी

2. पर्यायी उपाय – कापडी पिशव्या, ज्यूट बॅग

3. प्लास्टिक संकलन केंद्रांची वाढ

4. शाळा-हायस्कूलमध्ये जनजागृती

5. "My Area, My Cleanliness" अभियान

🔚 NewssKatta चं मत:

"विकास हवा, पण पर्यावरण संपवून नव्हे!"

कोल्हापूरच्या सुंदरतेचा भाग असलेली नद्या, रस्ते, मंदिरं प्लास्टिकमुळे विटाळली जात आहेत. यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनी सुद्धा सजग झालं पाहिजे.


📌 लेखक: NewssKatta टीम

🗓️ दिनांक: 26 जून 2024


थोडे नवीन जरा जुने