🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

परीक्षेच्या गुणांनी तिचं आयुष्य गमावलं - रागात बापानेच आपल्या लेकीला संपवलं

 कोल्हापुर - बापानेच केला मुलगीचा खून सकाळी सकाळी घटना कानावर आली काळीज सुन्न झालं. एक अल्पवयीन, हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी मुलगी... तिच्या वडिलांच्या हातूनच पोटात आणि डोक्यावर जबर मारहाण होऊन मरण पावते! शिक्षण घेणं, यशस्वी होण्याची धडपड, आणि पालकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न... एवढंच तिचा गुन्हा होता?साधना भोसले. वय १७. एका खाजगी शिकवणीमध्ये बारावीची तयारी करणारी हुशार, कष्टाळू मुलगी. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. आई-वडिलांचंही हेच स्वप्न होतं. तिच्या शाळेतील परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवणारी ही मुलगी गावात पहिल्या क्रमांकावर आली होती.पण शिक्षणाच्या प्रवासात एक चूक झाली – एका सराव परीक्षेत गुण थोडे कमी मिळाले. आणि इथूनच तिच्या जीवनातला अंधार सुरु झाला. धोंडीराम भोसले. गावातील माध्यमिक शाळेतील शिक्षक. एका शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष. पोलिसपाटील. समाजाने ज्यांना "मार्गदर्शक" मानले, त्यांच्याच हातून त्यांच्या मुलीचा जीव गेला.शुक्रवारी रात्री एका साध्या कारणावरून – "कमी गुण का मिळाले?" – यासाठी त्यांनी आपल्या चिमुकल्या मुलीला विचारणा केली. "कसा खर्च करतोस, डॉक्टर कशी होणार?" असं म्हणत त्यांनी संतापाने रागाच्या भरात तिला मारहाण केली.साधनाचा प्रश्न... रात्रभर प्रत्येक संवेदनशील वाचकाच्या मनात घुमत राहतो. "पप्पा, तुम्हीही शिक्षक आहात. तुम्हालाही कमी गुण मिळाले होते का? तुम्ही कधी कलेक्टर झाला होता का?"हा प्रश्न तिच्या तोंडून बाहेर आला, आणि वडिलांना संताप आला. त्यांनी लागलीच घरातील लाकडी खोंड्याने, पोटात लाथा घालून, डोक्यावर घाव करून मुलीला जमिनीवर फेकून दिलं. आईने मधे पडून तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण...ती रात्र साधनासाठी शेवटची ठरली. 



शरीर रक्ताने भरलेलं होतं. ती बेशुद्ध झाली. शनिवारी सकाळी ती शाळेत न गेल्यामुळे, इतर विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांना संशय आला.आईने धाडस करून पोलिसात तक्रार केली. शवविच्छेदनात अंगावर आढळलेली जखमा आणि शारीरिक छळाचे पुरावे पाहून पोलिसांनी वडिलांना अटक केली.प्रीती भोसले. ही फक्त एक आई नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली ‘शक्ती’ आहे. नवऱ्यावरच तक्रार देणं हे सहज नाही. ती एक शिक्षिकेची पत्नी होती, गावातली माजी सरपंच होती. पण तिने हे नातं बाजूला ठेवलं आणि न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला.तिने थेट आतपाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि तिच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीला तुरुंगात पाठवलं.एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळालं म्हणजे मूल अपयशी ठरतं का? शिक्षकच जर आपल्या मुलांवर क्रूरता करत असतील, तर समाज काय शिकणार? एक वडील आपल्या मुलीचा जीव घेतात, कारण ‘ती डॉक्टर कशी होणार’ – हीच विचारसरणी चुकीची नव्हे का?शिक्षक म्हणजे काय? ज्ञानदाते, प्रेरणादाते, समजूतदारपणा दाखवणारे! पण जेव्हा एक शिक्षकच आपल्या घरात राक्षसी वर्तन करतो, तेव्हा संपूर्ण समाजाला एक आरसा दाखवतो – आपण कुठे चाललो आहोत?धोंडीराम भोसले यांचं शिक्षण, पद, ओळख – हे सर्व त्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूसमोर शून्य ठरतं.किती पालक अजूनही हेच समजतात की कमी गुण म्हणजे अपयश? आपल्या अपेक्षा मुलांवर लादणं हे त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करतं. मुलांनी जर परीक्षेत नापास होणं हीच ‘शिकवण’ असती, तर अनेक थोर माणसं आज इतिहासात नसती.शिक्षण म्हणजे माणूस घडवणं. गुण, यश, स्पर्धा या गोष्टी शिक्षणाचा भाग असल्या तरी माणुसकी, सहनशीलता, समजूतदारपणा आणि प्रेम या गुणांचा समावेश नसेल, तर ते शिक्षण ‘शून्य’ आहे. पालकांनी आपल्या मुलांना समजून घ्यावं, त्यांच्याशी संवाद साधावा.शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची मर्यादा लक्षात ठेवावी.समाजाने अशा घटनांना केवळ वाचून विसरू नये, तर त्यांच्या मुळाशी जाऊन विचार करावा.साधना आज नसली, पण तिचा तो एक प्रश्न – "पप्पा, तुम्हीही शिक्षक आहात ना?" – अजूनही आपल्याला विचारतोय. तुम्ही शिक्षक आहात, पालक आहात, शेजारी आहात, माणूस आहात... पण जर तुम्ही मुलांच्या मनाचा आदर करत नाही, त्यांच्या चुका समजून घेत नाही, तर तुमचं सगळं शिक्षण व्यर्थ आहे. साधनाच्या मृत्यूमागे एक मरणारी पिढी आहे – जी गुणांच्या ओझ्याखाली दबते, अपेक्षांच्या गर्दीत हरवते, आणि कोसळते... आपण ती वाचवणार आहोत की गप्प बसणार आहोत?

थोडे नवीन जरा जुने