🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

खड्ड्यात हरवला मोरेवाडीचा रस्ता, ग्रामपंचायतीला जाग कधी येणार?

कोल्हापूर / मोरेवाडी (चेतन सूर्यवंशी)

आर. के. नगर हौसिंग सोसायटी नं. ५ मधील विद्या मंदिर मोरेवाडी शाळेसमोरील मुख्य रस्ता अक्षरशः मड ट्रॅकसारखा झाला आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.मोरेवाडी गाव, शेवट बस स्टॉप, सोसायटी नं. ३, ४ तसेच आजूबाजूच्या अनेक हौसिंग सोसायट्यांना हा रस्ता मुख्य रस्त्याशी जोडतो. त्यामुळे दिवसभर येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. 


शाळेतील विद्यार्थी, त्यांना सोडायला येणारे पालक, तसेच मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांची देखील या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे होती. मात्र, हे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब झाल्यासारखा झाला असून, मोरेवाडी ग्रामपंचायतदेखील याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. वाहन खड्ड्यात गेले की ते घसरणे निश्चितच असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच रहिवाशांना रोजच्या रोज नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. (end)

स्थान: आर. के. नगर हौसिंग सोसायटी नं. ५ मुख्य रस्ता, विद्या मंदिर मोरेवाडी शाळेजवळ, मोरेवाडी, कोल्हापूर.

أحدث أقدم