🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

ॲड. वृषाली इंगळे-पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदावर ॲड. कु. वृषाली पांडुरंग इंगळे-पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने करण्यात आली.


पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. वृषाली इंगळे-पाटील यांनी पक्षाशी दाखवलेली निष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रीय सहभाग आणि विचारधारात्मक पातळीवर केलेले प्रबोधन यामुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.


या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाच्या उच्च पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अजितदादा आणि तटकरे साहेबांची आभारी आहे. ही संधी म्हणजे माझ्या कार्याची पोचपावती आहे."


वृषाली इंगळे-पाटील या एक अभ्यासू वक्त्या असून त्यांनी महाराष्ट्रभर फिरून शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर व्याख्यानं दिली आहेत. त्या एक अभ्यासू शिवव्याख्यात्या म्हणून ओळखल्या जातात.

त्यांनी विधी शाखेत वकिलीच्या माध्यमातून प्रवेश करत, "जनतेचे कल्याण हा पहिला कायदा" या तत्त्वानुसार अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी पक्ष प्रवक्ता, जिल्हाध्यक्ष यासारख्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.


राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, कार्याध्यक्ष निर्मला नवले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांचे सतत सहकार्य व मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. पुढील काळातही पक्षवाढीसाठी त्या अधिक सक्रीय राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



थोडे नवीन जरा जुने