🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

ईशान अमेय खोपकरचा सिनेसृष्टीत डेब्यू; ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...

कोल्हापूर - मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असलेल्या ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीमकडून आणखी एक सरप्राइज प्रेक्षकांसमोर आले आहे. चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्यामुळे निर्माते अमेय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमेय खोपकर याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.


यापूर्वीच्या भागात सनी-बबलीच्या गोड नात्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. मात्र, तिसऱ्या भागात कथेला नवा ट्विस्ट मिळताना दिसतोय. सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरत असल्याने बबलीच्या आयुष्यात प्रचंड भावनिक वादळ उठते आणि ती तिच्या मनातील वेदना ‘उडत गेला सोन्या’ या गाण्यात व्यक्त करते.


हे गाणे भावनिक असले तरी त्याची सादरीकरणाची पद्धत हटके आहे. दमदार बीट्स, तडक-भडक कोरिओग्राफी आणि रंगतदार व्हिज्युअल्समुळे हे गाणे ‘जनरेशन Z’ ला आकर्षित करत आहे. गाण्यात ईशान खोपकरसोबत सोनाली खरे आणि अन्य कलाकारही झळकत आहेत.

या गाण्याला सायली पंकज, रविंद्र खोमणे, राधा खुडे, सौरभ साळुंके, मुनव्वर अली, अपूर्वा निशाद, सावनी भट्ट यांच्या आवाजाची साथ लाभली असून, संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत आणि डॉ. विनायक पवार यांचे बोल गाण्याला खास बनवतात.


दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “हे गाणे मजेशीर आहे, पण त्यातून कथेत महत्त्वाचा बदल दाखवला आहे. काय घडते ते प्रेक्षकांनी चित्रपटातच पाहावे.”


निर्माते अमेय खोपकर यांनी आपला आनंद व्यक्त करत सांगितले, “हे गाणे माझ्यासाठी खास आहे. कारण माझ्या मुलाने याच गाण्यातून मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे. हे आमच्यासाठी भावनिक क्षण आहे.”निर्माते निनाद बत्तीन म्हणाले, “सनी-बबलीच्या नात्यातील हा टर्निंग पॉईंट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”तर, धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणाले, “येरे येरे पैसा ही सिरीज धमाल आणि मनोरंजनासाठी ओळखली जाते आणि हे गाणे त्या उत्साहात भर टाकणारे आहे.”


धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत, अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. निर्मात्यांमध्ये सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ, तर सहनिर्माते सौरभ लालवाणी यांचा समावेश आहे.


चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारखे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार झळकणार आहेत.‘येरे येरे पैसा ३’ १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


थोडे नवीन जरा जुने