🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापुरी चप्पलचं 'इटालियन' वलय! PRADA टीम कोल्हापुरात; जगाच्या रंगमंचावर मराठमोळ्या हस्तकलेचा डंका

  कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी |

"कोल्हापुरी चप्पल" हे फक्त पायात घालायचं साधं वस्त्र नाही, ती आपल्या मातीतली अस्मिता, परंपरा आणि कौशल्याचा वारसा आहे. याच चप्पलीच्या प्रेमात आता जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड PRADA पडले आहे. त्यांच्या टेक्निकल टीमने नुकतीच कोल्हापूरमध्ये भेट दिली आणि येथील चप्पल व्यवसाय, हस्तकला आणि कारागिरांचा कार्यप्रक्रिया अनुभवली.



 PRADAची टीम म्हणाली: “This is Pure Art!”

 PRADA ब्रँडच्या तांत्रिक टीमने कोल्हापुरातील प्रसिद्ध चप्पल उत्पादक कारागिरांच्या वर्कशॉपला भेट दिली. त्यांनी केवळ पाहणीच नाही, तर पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या चप्पलींचे कौतुकही केले.

> “We saw history in your hands,” असे भावनिक उद्गार त्यांच्या एका प्रतिनिधीने काढले


हस्तकलेपुढे इटालियन 'ब्रँड'ही नतमस्तक

 PRADAच्या टीमने कोल्हापुरी चप्पली घालून फोटो सेशनही केलं. पारंपरिक शिक्कामोर्तब पद्धती, सडेतोड कातडी प्रक्रिया आणि सुबक शिवण – यावर ते थक्क झाले. "इटलीमध्ये मशीनवर तयार होणाऱ्या वस्त्रांपेक्षा, येथे हातांनी घडणारी कला जास्त 'जिवंत' आहे," असे त्यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले.



 कारागिरांचे डोळे भरून आले - कोल्हापुरातील एका वृद्ध कारागिराने सांगितले,आम्ही आयुष्यभर या चप्पलांवर जीव टाकला. पण आज PRADAसारख्या कंपनीचे लोक आमचं काम पाहायला आले, याचा आनंद शब्दांत नाही सांगता येणार...” PRADA ही टीम या हस्तकलेवर आधारित काही खास प्रोडक्ट्स त्यांच्या आगामी फॅशन कलेक्शनमध्ये वापरण्याचा विचार करत आहे.याचा अर्थ – उद्या पॅरिस किंवा मिलान फॅशन शोमध्ये "कोल्हापुरी चप्पल" दिसल्या, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही!

कोल्हापूरचा पारंपरिक वारसा आज फॅशनच्या जागतिक मंचावर पोहोचतो आहे. ही केवळ कोल्हापुरासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


أحدث أقدم