कोल्हापूर
समाज बदलतोय… प्रश्नही नवे निर्माण होतात… आणि त्यावर चर्चा, चिंतन, मंथन हवं असतं. या विचारातूनच श्री शाहाजी छत्रपती महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागात ‘समाज संवाद’ अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमात युवक मंथन, समाज चिंतन आणि दिशा शोधण्याचा एक सशक्त प्रयत्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. पांडुरंग सारंग (मुरगूड महाविद्यालय) यांनी समाजशास्त्राच्या नव्या वाटा स्पष्ट करत विद्यार्थ्यांना चिंतनशील बनण्याचे आवाहन केले.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर के. शानेदिवाण यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून या संकल्पनेचं कौतुक केलं.
डॉ. के एम. देसाई (प्रमुख, समाजशास्त्र विभाग) यांनी स्वागत करत मंडळाची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन पी पी. भाटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. व्ही व्हि कुरणे यांनी केलं.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर डी मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए बी बलुगडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी के. वळवी, प्रबंधक आर जे भोसले, अधीक्षक एम व्हि भोसले, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगराव बोंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.