🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

शनिशिंगणापूर देवस्थानच्या अधिकाऱ्याची आत्महत्या – दबावामुळे मृत्यू की व्यवस्थेतील सड्याचं गुपित?

अहिल्यानगर | 27 जुलै 2025

संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धेचं प्रतीक असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये गोंधळ, अनियमितता व राजकीय हस्तक्षेप याबाबतचे वाद सध्या शिगेला पोहोचले असतानाच, देवस्थानचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नितीन शेटे यांनी आज सकाळी स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या नसून त्यामागे दबाव, धमक्या आणि व्यवस्थेतील गुपित लपवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून शनी देवस्थानाबाबत अनेक तक्रारी, बनावट अॅप्स, अनावश्यक भरती आणि आर्थिक अपारदर्शकतेसंदर्भात आवाज उठवला जात होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात या गोंधळाची कबुली देत चौकशी नेमल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर, नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.

गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि देवस्थानाशी संबंधित काही माजी पदाधिकाऱ्यांनी यावर थेट आरोप करत म्हटले की, “शेटे यांच्याकडे देवस्थानातील आर्थिक व प्रशासनातील बड्या व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांची पुरावे असणाऱ्या फाईल्स होत्या. त्या उघड झाल्यास अनेकांची नावे समोर आली असती.” त्यामुळे त्यांच्यावर दबाव होता की काय, असा सवाल उभा राहिला आहे.

ही घटना घडल्यानंतर स्थानिक राजकीय मंडळी, देवस्थानचे विश्वस्त मंडळ व प्रशासन अजूनही मौन बाळगत आहे. नितीन शेटे यांच्या मृत्यूप्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य न आल्याने संशय अधिक गडद होत आहे.
शेटे यांची आत्महत्या ही एखाद्या “मोठ्या घोटाळ्याच्या” झाकण्यासाठी राजकीय बळी तर नव्हे ना? असा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात घर करत आहे.

सध्या पोलीस विभागाकडून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल व डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. मात्र, या घटनेचा संबंध राजकीय दबाव, देवस्थानातील अंतर्गत वाद वा माहिती लपवण्याच्या प्रयत्नांशी आहे का, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.

सामाजिक संघटना, पत्रकार आणि गावकरी जोरदार मागणी करत आहेत की या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा. तसेच, “ही आत्महत्या नसून व्यवस्थेतील काहीजणांनीच त्यांना मृत्यूच्या उंबरठ्यावर नेले” असा संतप्त सूर जनतेतून उमटत आहे.


थोडे नवीन जरा जुने