🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

गावाहून परतली आणि काही तासांतच जीवन संपवलं – विद्यार्थिनीची दुर्दैवी कहाणी

 कोल्हापूर – शिक्षणाच्या उंबरठ्यावर असताना, स्वप्नांची उंच भरारी घेण्यासाठी घरापासून दूर राहणारी एक तरुणी… पण कालांतराने तिने अशा मार्गाचा अवलंब केला की संपूर्ण विद्यापीठ हादरले. शिवाजी विद्यापीठातील एमएस्सी भूगोल (भाग-१) शिकणारी २१ वर्षीय गायत्री पंढरीनाथ रेळेकर (रा. सांगलीवाडी, जि. सांगली) हिने सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह क्रमांक १ मधील स्वतःच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.


दुपारी दोनच्या सुमारास उघड झालेल्या या घटनेने विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली. नेहमी विद्यार्थिनींच्या हास्य-टवटवीने भरलेले वसतिगृह काही क्षणांत शोकाकुल झाले. तिच्या मैत्रिणींच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि नातेवाईकांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

घटनेची माहिती मिळताच कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, वसतिगृहाच्या अधीक्षक डॉ. मीना पोतदार, तसेच सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगलीहून गायत्रीचे आई-वडील व नातेवाईक तातडीने विद्यापीठात दाखल झाले. प्रिय व्यक्तीचे पार्थिव पाहताच आई-वडिलांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. शेंडापार्क येथील शवविच्छेदनाला कुटुंबीयांनी विरोध दर्शवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कसे घडले प्रकरण?

गायत्री ८ ते ११ ऑगस्टदरम्यान गावाकडे गेली होती. सोमवारी सकाळी ती परत वसतिगृहात आली. वडिलांना फोन करून ‘मी सुरक्षित पोहोचले’ असे सांगितले. मात्र काही तासांनीच सर्व काही संपले. दुपारी दोनच्या सुमारास तिची रूममेट विभागातून परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तिने दरवाजावर ठोके दिले, मोबाईलवर कॉल केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शंका आल्यानंतर इतर विद्यार्थिनींच्या मदतीने खिडकीतून आत डोकावले असता गायत्री फॅनला ओढणीने लटकलेली दिसली. लगेचच अधीक्षक आणि सुरक्षारक्षकांना कळवून दरवाजा तोडण्यात आला, पण तोपर्यंत सर्व काही उशीर झाला होता.


राजारामपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पंचनामा केला. पोलिसांनी गर्दी हटवून परिसर शांत केला. घटनास्थळावर सापडलेली परिस्थिती पाहून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


विद्यापीठात या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. “गायत्री अभ्यासू, शांत स्वभावाची मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं,” अशी प्रतिक्रिया तिच्या ओळखीच्या विद्यार्थिनींकडून व्यक्त झाली. मात्र, मनातील वेदना कोणालाच कळल्या नाहीत, आणि एका क्षणात तिच्या आयुष्याची वाटचाल थांबली.


थोडे नवीन जरा जुने