🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

सर्वसामान्यांसाठी खुशखबर गरजा होणार स्वस्त ; शौक महाग !

कोमल वखरे - दिल्ली :- वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कर प्रणालीतील महत्वपूर्ण बदल करण्यासाठी राज्याच्या अर्थ मंत्र्याच्या गटाने  मान्यता दिली आहे त्यानुसार आता जीएसटी मध्ये ५ टक्के आणि १८ टक्के असं दोन स्लॅब राहणार आहेत त्यामुळे अनेक करांमध्ये सुलभता येणार आहे त्यामुळेच दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होऊन त्याचा सर्वसामान्यांना अधिक फायदा होणार आहे या संदर्भातील अंतिम निर्णय  सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होईल  बिहारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या मंत्रिगटाने हा प्रस्ताव ठेवला तर परिषदेत ७५ टक्के बहुमताने सुधारणीला मंजुरी दिली  तर हा निर्णय  देशभरात लागू होईल



أحدث أقدم