🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

लग्नानंतरचं प्रेम… जे शब्दात मावत नाही

कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर आणून उभं करतं, जिथे तर्क, नियम, समाज, संस्कार सगळंच क्षणभरासाठी गौण होतं. तिथे फक्त मनाचं बोलणं महत्त्वाचं राहतं. प्रेमाचं खरं सौंदर्य कदाचित असंच असतं त्याला वयाचं बंधन नसतं, नात्याचं बंधन नसतं, आणि योग्य अयोग्य या सगळ्या सीमारेषा ते सहज ओलांडून जातं.

तीचं लग्न झालं आहे. माझं नाही. पण तरीही… प्रेम झालं आहे. आणि ते प्रेम इतकं जिवंत आहे, की दररोज तिच्या अस्तित्वाचा गंध माझ्या श्वासात मिसळलेला असतो.

प्रेम कधी येईल, कुणावर येईल, आणि किती खोलवर येईल हे आपण ठरवू शकत नाही.ते येतं, व्यापून टाकतं आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हळुवार घर करून राहतं. ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मी नात्याची व्याख्या वेगळी समजत होतो. पण आज जाणवतं प्रेमाला कोणत्याही नात्याची परवानगी लागत नाही.


एखादं नातं फक्त आठवणींवर जगू शकत नाही. त्याला सहवासाची, स्पर्शाची, आणि एकमेकांबरोबरच्या वेळेची गरज असते. तिचं हसणं माझ्या दिवसाला उजळतं, तिची नजर माझं मन शांत करतं, आणि तिच्या जवळ बसून काही क्षण जगणं… तेच माझ्यासाठी आयुष्याचं सर्वात मोठं सुख आहे.

हो, मला ठाऊक आहे समाजाच्या चौकटीत हे चुकीचं ठरेल. पण मनाला काय सांगू? जे आहे ते आहे. हे प्रेम तर्काने नाही, तर हृदयाच्या धडकनांनी उमटलं आहे.हे चुकीचं असेल, पण ते नाकारून जगणं माझ्या शक्तीबाहेरचं आहे.

ही चूक असेल, तर ही चूक मी आयुष्यभर करत राहीन. जी शिक्षा मिळेल, तीही हसत स्वीकारेल.कारण या प्रेमाच्या बदल्यात मिळणारी वेदना सुद्धा माझ्यासाठी गोड आहे. जर हा प्रवास पाप असेल, तर मी आनंदाने पापी होईन.

ती फक्त माझ्या आयुष्यात नसून, ती माझ्या मनात, भावनांमध्ये, शरीरात, आणि आत्म्यात आहे. मला तिची गरज आहे ,मानसिक आधार म्हणून,भावनिक सुरक्षितता म्हणून आणि कधी कधी शारीरिक जवळीक म्हणूनकारण काही नाती फक्त आत्म्यापर्यंत मर्यादित राहत नाहीत ती संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकतात.

कदाचित तिच्यासोबत शारीरिक क्षण घालवणं चुकीचं ठरेल. पण जर तिच्या मांडीवर डोकं ठेवलं, आणि तिथे मला आयुष्याची सगळी थकवा विरघळल्यासारखं वाटलं… तर मी तो क्षण घेईन.जर तिच्या मिठीत मला शांतता मिळाली, तर ती मिठी घेईन.त्या क्षणी योग्य-अयोग्य हे शब्द नष्ट होतील,आणि उरेल फक्त ती आणि मी.कधी कधी आपल्या मनातील ओढ इतकी तीव्र असते, की शब्द अपुरे पडतात आणि डोळ्यांचा संवादच पुरेसा ठरतो. तिच्या जवळ बसून तिचा श्वास जाणवणं, तिच्या केसांचा सुगंध मनात साठवणं, तिच्या हाताला स्पर्श करताना नाडीच्या ठोक्यांची धडधड ऐकणं… या छोट्या क्षणांतच प्रेमाचं खरं गुपित लपलेलं असतं.हो, समाज सांगेल शारीरिक जवळीक चुकीची आहे.पण मला वाटतं, शारीरिक जवळीक म्हणजे फक्त शरीरांचा मिलाप नाही. ती म्हणजे…तिला मिठीत घेऊन तिचा थरथरता श्वास जाणवणं...तिच्या हाताच्या तळव्यावर बोटं फिरवून तिला शांत करणं..तिच्या खांद्यावर डोकं ठेवून सगळे ताण विरघळवणं

तिच्या हृदयाचे ठोके ऐकत हळूहळू झोपेत जाणं,जर तिच्या मांडीवर डोकं ठेवून मला जगाची सगळी वेदना विसरणं शक्य होत असेल तर मी ते करेन.जर तिच्या मिठीत मला माझं जग सापडत असेल तर ती मिठी घेईन.आणि जर तिच्या स्पर्शात मला माझ्या आत्म्याचा हरवलेला तुकडा मिळत असेल तर तो स्पर्श मी कधीही सोडणार नाही.आणि त्या क्षणी, शरीरांच्या एकत्र येण्याला कुठलीही सीमा नसावी.त्या वेळेला योग्य-अयोग्य या संकल्पना संपून जातात… आणि उरतं फक्त दोन हृदयांचं धडधडणारं एकत्र आयुष्य.शारीरिक जवळीक इथे पाप नाही… ती आपल्या प्रेमाची निःशब्द, पण सर्वात खरी भाषा आहे.

कधी वाटतं तिच्याकडे माफी मागावी. पण मग मन सांगतं, “तू चुकलाच कुठे आहेस?”कारण प्रेम करणं ही चूक नसते… 

ती काय विचार करते, हे पूर्णपणे मला ठाऊक नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की *मी तिच्या मनात खोलवर आहे* कधी कधी डोळ्यातून, कधी शांततेतून, आणि कधी अनकथित शब्दांतून ती ते जाणवून देते.

हे नातं कधी जगासमोर येईल का, माहिती नाही. कदाचित हे एक गुपित राहील… आपल्या दोन हृदयांच्या दरम्यान.

पण जिथे तिची आठवण आहे, तिथे मी जगतो. जिथे तिचा स्पर्श आहे, तिथे मी श्वास घेतो.

आणि जर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रेम असंच गुपित राहिलं… तरीही मी आनंदी असेन.

कारण मला माहीत आहे तिला मी मिळालो… आणि मला ती.बाकी सगळं फक्त जगाचं आहे.

थोडे नवीन जरा जुने