🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापूरकरांसाठी दिलासा; अलमट्टी विसर्ग वाढवला, राधानगरी पावसाचा जोर कमी

 कोल्हापूर, दि. 20 ऑगस्ट 2025 – जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धरणांमधील पाणी पातळी आणि विसर्गामुळे पुराचा धोका कायम आहे. राधानगरी आणि अलमट्टी धरणांमधून सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्हा प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे.


राधानगरी धरण: पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असून, धरणाच्या एकूण 7 स्वयंचलित दरवाजांपैकी 4 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या फक्त 3 दरवाजे (क्र. 3, 6, 7) खुले असून, स्वयंचलित पद्धतीने आणि BOT पॉवर हाऊसमार्फत नदीत पाणी सोडले जात आहे. विशेषतः स्वयंचलित दरवाजांमधून 4,284 क्युसेक तर BOT पॉवर हाऊस मधून 1,500 क्युसेक, एकूण 5,784 क्युसेक विसर्ग सुरु आहे.


अलमट्टी धरण: आज सकाळी 9 वाजल्यापासून विसर्ग 2 लाख 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग 2 लाख क्युसेक होता. धरणातून पाणी सोडल्यामुळे आसपासच्या नदी पातळीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.


राजाराम बंधारा: जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी 10 वाजता 40 फुटांवर पोहोचली आहे, तर इशारा पातळी 39 फुट आहे. बुधवारी पहाटेपासून नदीत सतत पाणी वाहत आहे. पाण्याखाली अनेक बंधारे आणि शेतीची जमीन येत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी किनाऱ्याजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी म्हणतात की, पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी धरणांचा विसर्ग सतत सुरु असल्यामुळे पूर्वतयारी आणि सतर्कता अत्यंत गरजेची आहे. स्थानिक पोलीस, राखीव यंत्रणा आणि बचाव पथके सतत तत्पर ठेवण्यात आले आहेत.

थोडे नवीन जरा जुने