विशेष लेख स्नेहल तोडकर
डिजिटल युगात इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माहिती पोहोचवणे सोपे झाले आहे. पण या सुविधेचा चुकीच्या पद्धतीने वापर होतो तेव्हा त्यातून “डिजिटल अश्लीलता” (Digital Pornography/Obscenity) उद्भवते.
डिजिटल अश्लीलता म्हणजे इंटरनेट, मोबाईल अॅप्स, वेबसाईट्स, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर अश्लील (अशोभनीय) सामग्री तयार करणे, प्रसारित करणे किंवा शेअर करणे. यात फोटो, व्हिडिओ, अश्लील संदेश किंवा व्हर्च्युअल कृतींचा समावेश होतो
प्रकार:
1. सोशल मीडियावर खोटे अकाउंट करून अश्लील फोटो/व्हिडिओ टाकणे
2. ब्लॅकमेलिंगसाठी अश्लील व्हिडिओ पाठवणे
3. पॉर्न साइट्सद्वारे प्रौढ चित्रफीत पाहणे व शेअर करणे
4. Deepfake तंत्रज्ञान वापरून खोटे अश्लील व्हिडिओ तयार करणे
परिणाम:
मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम
लैंगिक गुन्ह्यांची वाढ
वैयक्तिक गोपनीयतेचा भंग
तरुण पिढीत चुकीचे आकर्षण आणि व्यसन
कायदे:
भारतामध्ये IT Act 2000 आणि POCSO कायद्यांतर्गत डिजिटल अश्लीलतेवर कठोर शिक्षा आहेत. अशा प्रकारची सामग्री प्रसारित करणे हा दंडनीय गुन्हा आहे.