कोल्हापूर : शहरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेल्या फलक आणि साऊंड सिस्टीमवरून वाद उसळला. छोट्या कारणावरून पेटलेला हा वाद थेट दगडफेक, मारामारी आणि तोडफोडीपर्यंत पोहोचला. अखेर या दंगलप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शनिवारी दिवसभर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता.
या दंगलप्रकरणी दोन्ही गटातील अनेक जणांवर दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ३१ जणांची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासानंतर आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळपासून परिसरात शांतता होती; मात्र दंगलानंतर भागातील व्यवहार ठप्प राहिले. गणेशोत्सवाचा माहौल सुरू असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
गणेशोत्सव आणि आगामी सणांचा विचार करून प्रशासनाने शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तणाव कायम असल्याने सतत गस्त ठेवली जात आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कायदा हातात घेतल्यास कुणालाही सोडले जाणार नाही.
संशयित आरोपी
पोलिस हवालदार एकनाथ मारुती कळंत्रे यांच्या फिर्यादी नुसार राजेबागेस्वार परिसरातील संशयित आरोपी असिफ शेख, शाहरुख शेख ,कौशिक राजू पटवेकर, सोहेल पटवेगार,तनवीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला,तौसिफ शेख अब्दुल सिद्दिकी,अशपाक गॅसवाला, जरीब इनामदार,सोहेल शेख समीर मिस्त्री,परविन बशीर शेख, आश्रफ सिद्धीकी, इजाज शेख साहिल हकीम, फरहाज नायकवडी ,निहाल शेख, सद्दाम महात अश्फाक नायकवडी,इकबाल सरकवास, बिलाल शेख मुन्ना सिद्दिकी यांच्यासह अनोळखी दीडशे ते दोनशे जणांना गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धार्थनगर परिसरातील संशयित आरोपी सुरज कांबळे अभिजीत कांबळे शुभम कांबळे विजय पटकारे महेश कांबळे लखन कांबळे गणेश कांबळे यांच्यासह दीडशे ते 200 जणांवर गुन्हा दाखल केला
दंगलखोरांवर १८ कलमांनुसार गुन्हे
कोल्हापुरात उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी तब्बल १८ वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दंगल घडवणे, दंगलातील सहभाग, प्राणघातक हल्ला, रस्ता अडवणे, सरकारी कामात अडथळा अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक कलमानुसार शिक्षा वेगळी असून त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे –
भारतीय दंड संहिता कलम गुन्ह्याचे स्वरूप कमाल शिक्षा
141, 143 दंगल घडवणे - 2 वर्षे
147 दंगलातील सहभाग - 6 महिने
149 दंगलीस कारणीभूत - 6 महिने
307 प्राणघातक हल्ला - 5 वर्षे
353 सरकारी कामात अडथळा - 2 वर्षे
332 लोकोसेवकास दुखापत - 6 महिने
341, 146 रस्ता अडवणे - 3 महिने
338 दुसऱ्यांना गंभीर दुखापत करणे - 2 वर्षे
352, 323 इतरांच्या जीविताला धोका - 6 महिने
427 दुखापत / मालमत्तेचे नुकसान - 1 वर्ष
336 (फ) धोकादायक शस्त्र वापरणे - 9 महिने
435 (फ) स्फोटक पदार्थांचा गैरवापर - 3 वर्षे
352 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट - 1 वर्ष
या सर्व कलमांनुसार कारवाई झाल्यास आरोपींना ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. गंभीर कलमांमध्ये दोष सिद्ध झाल्यास कारावासाची मुदत आणखी वाढू शकते.