🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कॉम्प्युटर जिनियस स्पर्धेत शिंगणापूरच्या फ्रेंडशिप कॉम्प्युटरचा डबल धमाका!*धनश्री शेळके प्रथम तर रितिका देवधर दुसऱ्या क्रमांकावर...



कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब कोल्हापूर व असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स, कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय *कॉम्प्युटर जीनियस कॉम्पिटिशन 2025* या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज रोटरी क्लब कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर मा. श्री. प्रताप पुराणिक साहेब हे प्रमुख पाहुणे तर रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. अरुण गोयंका साहेब, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. अभिजीत हावळ सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी पाटील सर, उपाध्यक्ष  उमेश काकडे सर, सेक्रेटरी  नामदेव सूर्यवंशी सर, खजानिस  शहाजी पाटील सर, माजी अध्यक्ष सुरेंद्र मोटे सर, सर्व संचालक तज्ञ संचालक व जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

    कंप्यूटर जिनियस कॉम्पिटिशन ही दोन लेवल मध्ये घेतली जाणारी संगणक या विषयातील जिल्ह्यातील सर्वात मोठी ऑनलाइन स्पर्धा आहे. याचा प्रथम स्तर इन्स्टिट्यूट लेवल असून दुसरा जिल्हास्तरीय फायनल स्तर आहे. यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 5001, 3001 व 2001 व ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप असते . इन्स्टिट्यूट मधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना गोल्ड, ब्रांझ व सिल्वर मेडल तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 45 विविध संस्थांमधून सुमारे 3500 विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. 

यावर्षीचे कंप्यूटर जीनियस म्हणून विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे; 

१) प्रथम क्रमांक
धनश्री गजानन शेळके 
फ्रेंडशिप कॉम्प्युटर, शिंगणापूर 
बक्षीस :रुपये ५००० व ट्रॉफी 

२) द्वितीय क्रमांक 
रितिका संजय देवधर 
फ्रेंडशिप कॉम्प्युटर शिंगणापूर 
 बक्षीस :रुपये 3000 व ट्रॉफी

३) तृतीय क्रमांक 
शरयु दीपक जाधव 
तुळजाभवानी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी कोल्हापूर 
बक्षीस: रुपये २००० व ट्रॉफी

या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुकाराम बोडके सर यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून विश्वास आयआयटी व मेडिकल अकॅडमी, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर, व्हीएफएक्स ॲनिमेशन अकॅडमी, कोल्हापूर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, वाठार रानवारा ॲग्रो रिसॉर्ट, केर्ले, डॉ. डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांनी संस्थेला विशेष सहकार्य केले

थोडे नवीन जरा जुने