🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापूर सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल : २९ जून ते १३ जुलैपर्यंत प्रायोगिक निर्णय

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (CBS) परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (२९ जून) मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या आणि निघणाऱ्या एसटी बसांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल २९ जून ते १३ जुलै २०२४ दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे.



या अंतर्गत, पूर्वीच्या प्रवेशद्वाराचा वापर आता बसेस बाहेर पडण्यासाठी केला जाणार आहे, तर यापूर्वी ज्या गेटमधून बसेस बाहेर पडत होत्या, त्या गेटमधून आत प्रवेश केला जाणार आहे. यामुळे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

 या बदलाचा शहराच्या वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होईल का, याचा अंदाज घेण्यासाठीच ही चाचणी आणि पुढील १५ दिवसांचा प्रायोगिक कालावधी ठेवण्यात आला आहे.

नागरिकांच्या सूचना अपेक्षित

या कालावधीत स्थानिक नागरिक, एसटी प्रवासी आणि वाहनधारक यांनी नव्या वाहतूक व्यवस्थेबाबत आपले अनुभव, अडचणी व सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे लेखी स्वरूपात अथवा फोनवर कळवाव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे. प्राप्त होणाऱ्या प्रतिक्रिया आणि अनुभवाच्या आधारे पुढील कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल.



हा बदल केवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी व वाहनधारकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच स्थानिक पातळीवरील बदल समजून घेऊन वाहतूक नियमांचे पालन करावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने