आयुष्यातलं परफेक्ट लाइफचं कोड ?
आयुष्यातलं परफेक्ट लाइफचं कोड
सोडवावं तरी सुटत नाही,
या परफेक्ट आयुष्याच्या मागे धावताना
आयुष्य कधी निसटून जातं,
याचंही भान राहत नाही...
मला परफेक्ट करिअर,
मला परफेक्ट लाइफ पार्टनर,
मला परफेक्ट आयुष्य
या साऱ्यांच्या मागे तो नुसताच धावतोय...
पण समाधान या असीम शब्दांतच
आयुष्याच्या परिपूर्णतेचं आणि सुखाचं कोडं दडलंय,
हेच माणूस विसरून चाललाय...
आयुष्य नेहमीच परफेक्ट असायलाच हवं, असं काही नाही,
छोट्या आणि पुरेशा गोष्टींमध्येही
आयुष्य आनंदाने, मजेत जगता येतं.
माणसाच्या आयुष्यातलं 'परफेक्ट' भूत लवकर बाजूला सार,
कारण समाधानच परिपूर्णतेचं खरं कोडं आहे,
हे लवकर उमजू दे...
कॉलेज कट्टा विशेष - पूजा सत्यवान पाटील