🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापूरची सुदिक्षा पिसे साऊथ कोरियात चमकली!

कोल्हापूर :  साऊथ कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या जागतिक तायक्वाँडो कल्चर एक्स्पो २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (JSTARC) च्या सुदिक्षा पिसे हिने भारताचे प्रतिनिधित्व करत भव्य यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत २५ हून अधिक देशांचा सहभाग होता. त्यात होली क्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सुदिक्षा पिसे हिने स्पायरिंग आणि पुमसे प्रकारांत दोन सुवर्णपदक पटकावून भारताचा झेंडा उंचावला. तिच्या या कामगिरीमुळे JSTARC कोल्हापूरचे नाव राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.


आज सुदिक्षा पिसे कोल्हापूरात परत आल्यानंतर छत्रपती ताराराणी पुतळा येथे भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या स्वागतावेळी पिसे परिवार – सुशांत पिसे, दत्तात्रय पिसे, अभिजीत पिसे, मिलिंद पिसे, संपदा पिसे, चेतन पिसे, अभिषेक विंचू आणि इतर कुटुंबीयांनी आपल्या कन्येच्या या ऐतिहासिक यशावर गर्वाने डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात, फुलांच्या वर्षावात आणि कौतुकाच्या गजरात तिचे स्वागत केले.

सुदिक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रशिक्षक अमोल भोसले, नवीन दवे आणि ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे शिस्तबद्ध आणि कसून प्रशिक्षण मोलाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुदिक्षा हिने कठोर मेहनत करत हे यश मिळवले.

सुदिक्षा पिसेचे हे यश कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तिचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे.

थोडे नवीन जरा जुने