कोल्हापूर :शब्दांवर प्रेम असलेले आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याची जिद्द बाळगणारे विवेक भगवान पोर्लेकर यांनी UGC-NET जून 2025 ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयातून त्यांनी 62.67 टक्के परसेंटाईल मिळवले असून, Ph.D. प्रवेशासाठी ते पात्र झाले आहेत.
विवेक पोर्लेकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क विभागाचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या अभ्यासप्रवासात विभागातील मान्यवर प्राध्यापकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. विशेषतः विभागप्रमुख डॉ. निशा मुडे पवार, डॉ. चंद्रशेखर वानखेडे, डॉ. प्रसाद ठाकूर आणि डॉ. आलोककुमार जत्राटकर यांचे मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
विवेक यांचे वडील भगवान संतू पोर्लेकर आणि आई अनिता पोर्लेकर यांनी शिक्षणप्रवासात दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहन हेच त्यांच्या यशामागील खरे कारण ठरले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे येत, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून आज ते अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
पत्रकारिता, शैक्षणिक संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रांत सकारात्मक योगदान देण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असून, Ph.D. च्या माध्यमातून समाजभान जागवणारा ठोस आवाज निर्माण करणे हा त्यांचा ठाम संकल्प आहे