🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

परीख पूल उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार" – आमदार राजेश क्षीरसागर यांची ग्वाही

 कोल्हापूर | 28 जुलै 2025

कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. परीख पूल परिसरातील जर्जर स्थितीवर कायमचा उपाय म्हणून उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याची ग्वाही आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.


दाभोळकर कॉर्नर ते पाचबंगला या मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ ते महामार्ग क्र.१६६ या रस्त्यांना जोडणारा नवीन पूल केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला गेला आहे.


राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानांतर्गत, परीख पूल परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण आणि गटार निर्मितीच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कामासाठी ₹2 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


परीख पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, त्याच्या भिंती गळक्या व ठिसूळ झाल्या आहेत. पावसाळ्यात पुलाखालून सतत पाणी वाहत राहते, ज्यामुळे रस्ता खचतो आणि मोठमोठे खड्डे पडतात. वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच या मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.


या उड्डाणपुलास परीख पुलाशी जोडणारा स्वतंत्र पूल तयार करावा, अशी मागणी २६ मे २०२५ रोजी ई-मेलद्वारे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. शासन सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचे आमदारांनी नमूद केले.


कार्यक्रमाला माजी पदाधिकारी, स्थानिक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, रमेश पुरेकर, प्रकाश नाईकनवरे, अंकुश निपाणीकर, दुर्गेश लिंग्रस, आझम जमादार, कुलदीप देसाई, देवेंद्र खराडे, अभिजीत काशीद, शैलेश पाटील, सुमित साठम यांचा समावेश होता.

أحدث أقدم