🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

महापालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप; शाहू सेनेची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

 

कोल्हापूर | २८ जुलै २०२५

गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकाच्या अखत्यारीत असलेल्या कोल्हापूर महापालिकेत नुकतेच टक्केवारीच्या alleged घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शाहू सेनेने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन सादर करत सक्षम व प्रामाणिक प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास ४ ऑगस्ट पासून महापालिका चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा शाहू सेनेने दिला आहे.


शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, त्यात महापालिकेतील सध्याच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या कारभारावर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. "टक्केवारी प्रकरणात ठेकेदाराने पुराव्यासह आरोप केले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी उलट ठेकेदारावरच फिर्याद दिली, हे आक्षेपार्ह आहे. प्रशासनाची ही बोटचेपी भूमिका अत्यंत लाजीरवाणी आहे," असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच महापालिकेला पुन्हा सक्षम दिशा मिळावी यासाठी द्वारकानाथ कपूर यांच्यासारख्या प्रामाणिक व सक्षम प्रशासकाची नियुक्ती केली जावी.


शहरात सभागृह नसल्याने प्रशासनातील अनेक निर्णय हे पारदर्शकतेअभावी घेतले जात असून त्यामुळे महत्त्वाच्या नागरी सुविधा ठप्प, समस्या गंभीर बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहराच्या हितासाठी सशक्त प्रशासकीय नेतृत्वाची गरज असल्याचे शाहू सेनेचे म्हणणे आहे.

या निवेदनावर करण कवठेकर, शशिकांत सोनुले, प्रधान किरूळकर, सारंग पाटील, सौरभ आंबी, साहिल पडवळे, आशुतोष पाटील, संग्राम गायकवाड, रोहित शिंदे यांची सही आहे.








أحدث أقدم