कोल्हापूर – श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एक विशेष रुद्राक्ष प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजिला जाणार आहे. हि भव्य प्रदर्शनी ३० जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत स्टेशन रोडवरील पुश्कर मार्केटजवळील हॉटेल व्हिन्सेंट येथे सकाळी १०.३० ते रात्री ७ पर्यंत भरवली जाणार आहे.
हेमलता रुद्राक्ष इंडिया – नेपाळ या संस्थेच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात विविध प्रकारचे प्रमाणित, ऊर्जायुक्त आणि साक्षात नेपाळमधून आयात केलेले रुद्राक्ष उपलब्ध असतील. या ठिकाणी १ मुखी ते २१ मुखी पर्यंतचे रुद्राक्ष, गणेश रुद्राक्ष, गोरीशंकर रुद्राक्ष यांच्यासह व्यापार, आरोग्य, अध्यात्मिक साधना आणि ग्रहशांतीसाठी उपयुक्त अशा माळा, कवच आणि रत्न सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सर्व वस्तूंना शास्त्रानुसार पूजित करून, प्रमाणपत्रासह विक्री केली जाणार असून, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. ज्योतिष, वास्तुशास्त्र, अध्यात्मिक उपायांमध्ये रस असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 7097296666