🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

महावितरणचा इशारा – वीजबिल थकवल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू

कोल्हापूर/सांगली –: विजेचा वापर करूनही दरमहा नियमित वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महावितरणने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलातील सुमारे 3 लाख 67 हजारांहून अधिक ग्राहकांकडून एकूण 43 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी बाकी असून, महावितरणने यापैकी 5 हजार 897 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.


यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1,878 आणि सांगली जिल्ह्यातील 4,019 ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने स्पष्टपणे सांगितले आहे की, थकीत रक्कम तत्काळ न भरल्यास वीजपुरवठा बंद करण्याची कठोर कारवाई टाळता येणार नाही.


विविध ग्राहक वर्गांतील थकबाकीची रक्कम अशी:


घरगुती ग्राहक – 3.27 लाख ग्राहकांकडून 31.82 कोटी रुपये

व्यावसायिक ग्राहक – 28,755 ग्राहकांकडून 6.12 कोटी रुपये

औद्योगिक ग्राहक – 4,440 ग्राहकांकडून 2.96 कोटी रुपये

सार्वजनिक सेवा – 4,966 ग्राहकांकडून 2.24 कोटी रुपये

इतर वर्गवारी – 1,438 ग्राहकांकडून 41 लाख रुपये


कोल्हापूर जिल्ह्यातील विभागनिहाय थकबाकी:

कोल्हापूर शहर – 21,491 ग्राहक | 2.46 कोटी

कोल्हापूर ग्रामीण-1 – 45,138 ग्राहक | 3.22 कोटी

कोल्हापूर ग्रामीण-2 – 44,692 ग्राहक | 4.09 कोटी

जयसिंगपूर – 27,822 ग्राहक | 2.56 कोटी

इचलकरंजी – 21,169 ग्राहक | 3.68 कोटी

गडहिंग्लज – 21,715 ग्राहक | 1.46 कोटी


सांगली जिल्ह्यातील विभागनिहाय थकबाकी:

सांगली शहर – 32,252 ग्राहक | 5.26 कोटी

सांगली ग्रामीण – 33,089 ग्राहक | 3.61 कोटी

इस्लामपूर – 44,140 ग्राहक | 8.30 कोटी

कवठेमहांकाळ – 31,704 ग्राहक | 3.39 कोटी

विटा विभाग – 43,981 ग्राहक | 5.52 कोटी


ऑनलाइन भरणा सुलभ – प्रोत्साहनसुद्धा उपलब्ध

महावितरणने ग्राहकांसाठी ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे कुठूनही आणि केव्हाही वीजबिल भरणा करता येतो. डिजिटल पेमेंटवर 0.25% सूट दिली जात आहे.


तसेच, 5,000 रुपयांहून अधिक थकीत रकमेच्या ग्राहकांसाठी RTGS आणि NEFT यांसारख्या पद्धतींनी भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित माहिती ग्राहकांच्या बिलावर स्पष्टपणे नमूद आहे.

महावितरणने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले आहे की, ग्राहकांनी आपली थकीत वीजबिलं तातडीने भरावीत. अन्यथा, वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई टळणार नाही. ग्राहकांनी जबाबदारीने पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने