🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

गणेश मंडपासाठी रस्त्यांवर खड्डा खोदला, तर पालिकेचा १५ हजारांचा दंड!

मुंबई | गणेशोत्सवाची चाहूल लागली असून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, यंदा उत्सवाच्या तयारीत एक अनपेक्षित अडथळा उभा ठाकला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) रस्त्यावर मंडप उभारणीसाठी खड्डा खोदल्यास थेट १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा नवा नियम लागू केला आहे.


पूर्वी हा दंड फक्त २ हजार रुपयांचा होता. मात्र यंदा दंडाची रक्कम तब्बल साडेसात पट वाढवण्यात आल्याने मंडळांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गणेशभक्तांसाठी हा निर्णय नाहक अडथळा ठरत असल्याची प्रतिक्रिया विविध मंडळांनी नोंदवली आहे.


दुसरीकडे, राज्य सरकारकडूनही या नव्या नियमावलीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या मुद्द्यावरून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. “दोन हजार रुपयांचाच दंड आकारण्याच्या जुन्या नियमाचा फेरविचार व्हावा,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.


सार्वजनिक गणेशोत्सव हा मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. त्यामुळे मंडळांवर आर्थिक बोजा न टाकता सुज्ञतेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक मंडळांनीही स्पष्ट केले आहे.

थोडे नवीन जरा जुने