🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

लाल किल्ल्यावर महाराष्ट्रातील १५ सरपंचांचा विशेष सन्मान - ९ महिला सरपंचांचा गौरव

नवी दिल्ली- यावर्षीच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या भव्य सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून १५ सरपंचांचा समावेश असून, उल्लेखनीय बाब म्हणजे यापैकी ९ जणी महिला आहेत.


१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा स्वातंत्र्यदिन संदेश ऐकतांना हे सर्व सरपंच उपस्थित राहणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून त्यांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे.


निवडलेल्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, तसेच सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण’ आणि ‘मिशन इंद्रधनुष’सारख्या योजनांचे प्रभावीपणे शंभर टक्के कार्यान्वयन करताना, स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.


महाराष्ट्रातील निवड झालेल्या सरपंचांची यादी 

प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, माढा, सोलापूर), जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, कामठी, नागपूर), संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, शिरूर, पुणे), डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, अकोला), नयना अशोक भुसारे (भावसे, शहापूर, ठाणे), सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, मालेगाव, वाशिम), अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, देसाईगंज, गडचिरोली), संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, जामखेड, अहिल्यानगर), चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, सालेकसा, गोंदिया), रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, लाखनी, भंडारा), सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, दापोली, रत्नागिरी), पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, जिंतूर, परभणी), प्रमोद किसन जगदाळे (बिदल, मान, सातारा), शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, अंजनगाव सुर्जी, अमरावती) आणि प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, उदगीर, लातूर).


या सर्व मान्यवरांचा १४ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये औपचारिक सत्कार केला जाईल. यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह), केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


“आत्मनिर्भर पंचायत विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘सभा सार’ अ‍ॅपचे लोकार्पण होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ या मासिकाचा १६वा अंकही प्रसिद्ध केला जाणार आहे.

थोडे नवीन जरा जुने