🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

पंचगंगा स्वच्छतेला नवा आयाम – ३९५ कोटींच्या कामांना ग्रीन सिग्नल

 पुष्पा पाटील / इचलकरंजी – औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होत आहे. तब्बल ६०९.५८ कोटी रुपयांच्या मंजूर निधीमधून जीएसटी, भाववाढ आणि पीएमसी खर्च वगळता ३९५ कोटी रुपयांच्या कामांसाठी इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. या नामांकित कंपनीला आदेश देण्यात आले असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.


कार्यारंभ आदेश देण्याच्या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ईरप्पा नाईक, उपअभियंता अमित भुरले, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव व सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर आभिषेक सिंग उपस्थित होते.


या प्रकल्पाच्या मागील वाटचालीत, जुलै २०२२ मध्ये खासदार माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगेत जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत याला तत्वतः मान्यता मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आणि सप्टेंबर २०२४ मध्ये शासनाने ६०९.५८ कोटी रुपयांचा निर्णय जाहीर केला.निधीचे वाटप  वस्त्रोद्योग विभाग २५%, उद्योग विभाग ५०% आणि पर्यावरण विभाग २५%  अशा प्रमाणात करण्यात आले आहे.


प्रकल्पाचे मुख्य कामे:

इचलकरंजी, हातकणंगले आणि यड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ZLD (झिरो लिक्विड डिस्चार्ज) सह उन्नतीकरण

क्षमतेत वाढ

सुमारे ८१ कि.मी. सांडपाणी वाहिनी व पुनर्वापर पाईपलाईन

अन्य आवश्यक सुधारणा

‘इन्व्हायरो इन्फ्रा’ या कंपनीला रामगंगा नदी, काशी, मथुरा यांसारख्या ‘नमामी गंगे’ प्रकल्पांसह राजस्थानातील एसटीपी अपग्रेडेशनची यशस्वी कामे करण्याचा अनुभव आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्र्यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार माने यांनी नमूद केले.


खासदार माने यांचे मत:

“दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. ZLD प्रणालीमुळे या तीन औद्योगिक वसाहतीतून पंचगंगेत एक थेंबही सांडपाणी जाणार नाही. नदीला नवजीवन मिळेल, औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संतुलन साधले जाईल. मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न अखेर पूर्णत्वास जाईल.”



थोडे नवीन जरा जुने