🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

यांनीही साजरा करायचा का स्वातंत्र्य दिन? ब्रिटिशांकडून मिळालं स्वातंत्र्य पण शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था ( तुम्ही-आम्ही) देतेय का?

तीन वर्षापूर्वी अमित शहा म्हणाले होते, उत्तर प्रदेश मधील कोणतीही मुलगी रात्रीच्या 12 वाजता रस्त्यावरुन फिरू शकते. आणि दोन तीन दिवसापूर्वीच एका 21 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. सातच्या आत घरात हा नियम तिने मोडला आणि एक तास तीला घरी जायला उशीर झाला म्हणून बलात्कार?


सांग तू मुस्लिम आहेस का? धर्म विचारत रोहण पैठणकर या दलित तरुणाला गायचोर आहे या संशयाने झुंडीन दगडाने झालेली मारहाण . त्याचे कपडे उतरवत हिंदू आहे की मुस्लिम हे पाहिल गेलं. खामगाव ही मधील घटना. सर्वधर्म समभाव असलेल्या देशात बौद्ध आणि मुस्लिम धर्माच असणं गुन्हा आहे का?


सासरच्या त्रासामुळे घर सोडून आलेल्या संभाजीनगरच्या एका महिलेला राहण्यासाठी मदत केली म्हणून, पुण्यातील कोथरूडमधील तीन तरुणींना पोलीस स्टेशनला नेऊन केलेली मारहाण, जातीवरून दिलेल्या शिव्या, त्यांचा केलेला मानसिक छळ. आणि या सर्वांनंतर त्या सासरच्या त्रासाला सामोरं गेलेल्या महिलेचं काय झाल? हे तर बाजूलाच राहीलं. त्या मुलींची एफआयआर घेण्यासाठीच इतका मानसिक शारिरीक त्रास त्यांना दिला गेला. त्यामुळे इथून पुढे करेल का कोणती मुलगी कोण्या मुलीला मदत? आणि धाडसाने पुढे येऊन मागेल का न्याय?


कंत्राटीकरण बंद करावं म्हणून महिनाभरापासून सुरू असलेलं नाशिकमधील आदिवासी आंदोलन. प्रत्येक ठिकाणी होणार खाजगीकरण पाहिलं की वाटतं. शासनच देश चालवतंय का? इतक्यातच एका वकील मित्राचा फोन आला. त्याच्याकडे आलेली केस सांगत होता . लग्न होऊन एक वर्ष झालेलं, सर्व व्यवस्थित चालू होत. एका वर्षानंतर मात्र मुलीला सासरच्या लोकांकडून त्रास द्यायला सुरुवात झाली . कारण काय असेल? तिने एका बाळाला जन्म दिला . जे बाळ मुलगी आहे.


मुली छोटे कपडे घालतात म्हणूनच मुलींचा बलात्कार होतो. महासत्ता होण्याच स्वप्नं पाहणारा हा देश आजुन मुलींनी कोणते कपडे घालावे? यावरच चर्चा करतोय.

अजूनही देशात जातीवरूनच माणसाची किंमत ठरवली जाते. 

देशाच खाजगीकरण होतय, देश विकला जातोय. 

हुंड्यासाठी जीव घेतला जातो.मुलगी झाली म्हणून छळ होतो. 


देशाबाहेरील कोणी आपल्या मर्यादा ठरवू नये म्हणून दिलेला लढा जितका महत्त्वाचा आहे. तितकच महत्त्वच या शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांच्याही लढणं आहे.आणि जोपर्यंत देशातल्या प्रत्येकाला त्याच स्वातंत्र्य जाणवत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा हा चालूच राहील.या घटना मागील फक्त दहा-पंधरा दिवसातील आहेत.असो,यांच माहीत नाही पण आपल्यावर अजून कुठे वेळ आलीय ? तोपर्यंत आपला स्वातंत्र्य दिन आनंदात जावा.🌼🌿


-क्रांती शामल सुवर्णा .



أحدث أقدم