🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

अतिवृष्टीचा इशारा जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क...

कोल्हापूर : राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.



जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कागल-राधानगरी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर जिल्ह्यात सतत पाऊस होत असून राधानगरी व काळम्मावाडी धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना वेळेत सतर्क करणे आवश्यक आहे. नदीकाठच्या गावांना आवश्यक सूचना योग्य वेळी पोहोचल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले.


बैठकीत दररोज पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणातून होणारा विसर्ग, नद्यांची पाणी पातळी, तसेच अलमट्टी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी अतिवृष्टीसंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.





أحدث أقدم