🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

एकटेपण म्हणजे जीवन नसते !!

कोमल वखरे विशेष लेख 

एकटेपणा म्हणजे सुकून असं वाटायचं पण दिवसेंदिवस हाच एकटेपणा किती घातक आहे हे समजत आहे आयुष्य जगत असताना मित्र , कुटुंब , शेजारी , नातेवाईक यांचं महत्त्व खूप आहे मात्र ते कळून येत नाही नात्यांचा हाच सहवास आयुष्य अधिक रंगीन करून टाकते विचारांची देवाण-घेवाण इतरांची मते प्रत्येकाची विचारसरणी ही संवादातून कळते हा संवाद नाते निर्माण करतो मात्र एकटेपणाचा निर्णय हा थोड्या काळासाठी स्वतःच्या एकांतासाठी हवा काही काळासाठी मनशांतीसाठी हा निर्णय हितकारक ठरतो मात्र आयुष्य जास्त काळ एकटेपणा मध्ये जगणं अशक्य आहे एकटेपणामध्येच नैराश्य अति विचार अशा अनेक मानसिक आजारांना सामोरे जाव लागत आणि एवढेच नाही तर या मानसिक आजारांमुळे शारीरिक परिणामही दिसतात मन आणि शरीर या नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणूनच संवाद हा दोन्हीवर योग्यरीत्या प्रभाव पाडतो माझ्या वैयक्तिक अनुभवावरूनही सुरुवातीस मला एकटेपणा एकांत खूप प्रिय वाटायचा मात्र एकांतामध्ये जेव्हा मी स्वतःला वेळ दिला तेव्हा थोड्या वेळासाठी मला बरं वाटलं मात्र जास्त काळानंतर हाच एकांत हाच एकटेपणा मला सर्वात मोठी समस्या वाटू लागली माझ्या आयुष्यामध्ये मी कोणासोबत तरी संवाद साधावा असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले त्यामुळे मित्र-मैत्रिणींचा सहवासच अनेक टेन्शन मधून मुक्त करतो 

जिवलग नसतील तर हास्यही विरतं

एकटेपण आलं की जीवन हरवतं



أحدث أقدم