🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्याला गृहमंत्री घरी पाठवणार का

मुंबई  - माटुंग्यात सोमवारी सकाळी पावसामुळे शालेय बस पाण्यात अडकल्या, आणि त्यातले ५० हून अधिक विद्यार्थी काही काळ धोक्यात सापडले. पण तत्परतेने धावून आलेल्या माटुंगा पोलिसांनी त्यांना वाचवले, सुरक्षित ठिकाणी आणले आणि पालकांच्या ताब्यात दिले. या कार्यकुशलतेसाठी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जितके कौतुक केले जाईल तितके थोडेच. अशा प्रसंगांनी महाराष्ट्र पोलिसांचा जनतेवरील विश्वास वाढतो, पोलिसांबद्दल आपुलकी निर्माण होते. शासनानेही अशा धाडसी व संवेदनशील पोलिसांचा सन्मान करणे हीच वेळची गरज आहे.


परंतु दुःखाची बाब अशी की, याच पोलीस खात्यात काही अधिकारी वर्तनातून संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन करतात. अलीकडेच कुलकर्णी नावाच्या एका अधिकाऱ्याने गरीब आरोपीला सिने स्टाईल कमरेत लाथ घालून अपमानित केले. “सज्जनांचे रक्षण, दुर्जनांना शिक्षा” हे पोलिसांचे ब्रीदवाक्य असताना, न्यायालयाचा निकाल लागायच्या आधीच एखाद्याला त्याच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन छळणे म्हणजे पोलिस सन्मानाला काळिमा फासणारे कृत्यच. अशा घटना घडल्या की, जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतो हा अधिकारी सुशिक्षित, सुसंस्कारित कुटुंबातून आलेला आहे का, की कुठल्या क्रूर परंपरेतून?


सरकारने या दुहेरी वास्तवाकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. एका बाजूला संवेदनशीलता दाखवणारे पोलिस आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वागण्याने संपूर्ण पोलीस खात्याला बदनाम करणारे अधिकारी आहेत. गृहमंत्री म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी अधिक मोठी ठरते. त्यांनी अशा अधिकाऱ्याविरोधात तातडीने कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.


जनतेतला पोलिसांवरील विश्वास नाजूक आहे. तो वाचवायचा असेल, तर चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा हा समतोल साधलाच पाहिजे. महाराष्ट्रभरातून एकच मागणी होत आहे “या कुलकर्णीं पोलिसाला तात्काळ निलंबित करून घरी पाठवा.” अन्यथा “पोलिसांचा मित्र” ही ओळ केवळ घोषवाक्यातच उरून बसेल.

أحدث أقدم