🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

गंगाखेडच्या राणीसावरगावची कन्या डॉ. रोमा तांबोळी UPSC उत्तीर्ण होऊन वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त

गंगाखेड प्रतिनिधी :

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मौजे राणीसावरगाव या छोट्याशा खेड्यातील जिद्दी आणि मेहनती युवती डॉ. रोमा मुजमिल तांबोळी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण होत दिल्ली येथील केंद्रीय सरकारी आस्थापना विभागात वर्ग-१ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. या यशामुळे केवळ राणीसावरगाव नव्हे, तर संपूर्ण गंगाखेड तालुक्याचा मान अभिमानाने उंचावला आहे.


घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असूनसुद्धा रोमा यशस्वी होण्यासाठी झगडत राहिली. सततचा अभ्यास, कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास या जोरावर तिने हे मोठे यश संपादन केले.


तिच्या या शैक्षणिक प्रवासात आई-वडिलांचे मोलाचे योगदान राहिले. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या त्यागाबरोबरच रोमाची मेहनत, संघर्ष आणि सातत्य आज फळाला आले आहे.


डॉ. रोमा तांबोळीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक आणि सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत असून, राणीसावरगावची ही कन्या आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

أحدث أقدم