🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

महिला रोजगार : संधी की संघर्ष ?महाराष्ट्रातील वास्तव

कोमल वखरे विशेष लेख 

छ.संभाजीनगर - PLFS 2020-21 नुसार ग्रामीण महाराष्ट्रात महिलांचा श्रम सहभाग दर (LFPR) 27.7% आहे.शहरी भागात हा दर त्याहून कमी आहे.2024-25 मध्ये मनरेगा अंतर्गत 22.9 लाख महिला कामात सहभागी झाल्या.कृषी आणि असंघटित क्षेत्रात महिलांचा जास्त सहभाग असला तरी STEM क्षेत्रात केवळ 14% महिला आहेत.लग्नानंतर रोजगार दर सरासरी 12% ने घटतो.माविम, स्वयं-सहायता गट, ग्रामीण बचत गट या योजनांमुळे सुधारणा होत आहे.


महिलांचे अनुभव

फायदे :

1.घरगुती जबाबदाऱ्यांबरोबर ऑफिसची कामे निभावता येतात.

2.कुटुंबाची काळजी घेण्यास वेळ देता येतो.

3.घर आणि नोकरी यांच्यातील समतोल साधून स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येते.

तोटे :

1.घरगुती अडथळ्यांमुळे कामाच्या ठिकाणी व्यत्यय येतो.

2.काम-घर संतुलन साधताना मानसिक तणाव वाढतो.

3.करिअर प्रगतीत काचछत (Glass Ceiling) अजूनही अडथळा आहे.


मुलाखतीसाठी प्रश्न

1.मासिक पाळीदरम्यान महिलांना नोकरीतून खास सुट्टी मिळायला हवी का?

2.Work From Home पद्धती महिलांना कितपत फायदेशीर ठरते?

3.विवाहित महिला नोकरी + घर यात संतुलन कसे साधतात?

4.नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

5.कामाच्या तणावातून महिला मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतात?


प्रश्नांची दिशा

"ती आता त्याच्यावर अवलंबून नाही" – महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.


मात्र घराची, मुलांची जबाबदारी अजूनही तिच्याच खांद्यावर का?


पुरुषप्रधान समाजात तिच्या क्षमतेकडे कामगार म्हणून पाहिले जाते का की अजूनही 'स्त्री' म्हणूनच?


महिला दिन फक्त एका दिवसापुरता साजरा करायचा की प्रत्यक्षात समानतेची हमी द्यायची?


तिच्या आयुष्यातील निर्णय ती स्वतः घेणार की समाज, घर, आणि पुरुषांचे विचार ठरवणार?


महिला रोजगार ही आज संधीदेखील आहे आणि संघर्षदेखील. संधी आहे कारण महिला स्वावलंबनाच्या वाटेवर चालल्या आहेत, आणि संघर्ष आहे कारण सामाजिक-सांस्कृतिक बंधनं, घरगुती जबाबदाऱ्या, असुरक्षितता आणि मानसिक दबाव अजूनही अस्तित्वात आहेत.

أحدث أقدم