स्नेहल तोडकर विशेष लेख
भारतातील बहुतांश शाळांमध्ये आजही औपचारिक Sex Education दिलं जात नाही. फक्त जीवशास्त्राच्या पुस्तकातील Reproduction chapter पर्यंतच शिक्षण मर्यादित आहे. मात्र मुला-मुलींना या वयात consent, सुरक्षित लैंगिक संबंध, periods hygiene, मानसिक आरोग्य यासारख्या विषयांबद्दल योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
सरकारनं 2005 पासून Adolescent Education Programme सुरू केलं असलं तरी अनेक शाळा आणि पालकांच्या विरोधामुळे त्याचा अंमल पुरेसा झालेला नाही. “हे शिक्षण म्हणजे मुलांना चुकीच्या वाटेवर नेईल” असा गैरसमज अजूनही ठिकठिकाणी आढळतो.
तज्ज्ञांच्या मते, Sex Education नसल्यामुळे अनेक किशोरवयीन मुली इंटरनेट आणि सोशल मीडियावरून माहिती घेतात. मात्र त्यामध्ये चुकीची आणि अर्धवट माहिती जास्त असल्यामुळे misinformation पसरते. त्याचे परिणाम म्हणून teenage pregnancy, लैंगिक आजार, मानसिक तणाव अशी अनेक संकटं वाढतात.
शहरी भागातील मुलींना इंटरनेटमुळे माहिती मिळते, पण अजूनही समाजात हा विषय taboo मानला जातो. तर ग्रामीण भागात माहितीची मोठी कमतरता असून पाळी, गर्भनिरोधक, शरीरातील बदल याबाबत अनेक गैरसमज आढळतात.
तज्ज्ञांचा एकमताने सल्ला आहे की शाळांमध्ये Sex Education अनिवार्य करायला हवे. यामुळे मुली आत्मविश्वासाने वाढतील, योग्य आरोग्य पद्धती वापरतील आणि चुकीच्या माहितीपासून बचाव होईल.
शहरी व ग्रामीण मुलींच्या अनुभवातील फरक
भारतातील मुलींच्या दृष्टीने Sex Education हा विषय अजूनही “लाज आणि गुप्ततेच्या” चौकटीत अडकलेला आहे. पण जर आपण शहरी आणि ग्रामीण मुलींचे अनुभव पाहिले, तर यात स्पष्ट तफावत जाणवते.
शहरी मुली माहिती आहे, पण खुल्या चर्चेचा अभाव
शहरांमध्ये शिकणाऱ्या मुलींना इंटरनेट, सोशल मीडिया, यूट्यूब यामधून माहिती मिळते. Periods hygiene बाबत awareness sessions किंवा sanitary pad कंपन्यांच्या मोहिमा यामुळे थोडी प्रगती झाली आहे.
पण तरीही consent, contraceptives, मानसिक आरोग्य यावर अजूनही खुलेपणाने चर्चा होत नाही. पालकांशी बोलण्याऐवजी अनेक मुली गुपचूप गुगल सर्च करतात. त्यामुळे चुकीची किंवा porn वर आधारित माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते.
ग्रामीण मुली माहितीचा मोठा अभाव
गावांमध्ये परिस्थिती अजून गंभीर आहे. अनेक शाळांत sex education हा शब्दही उच्चारला जात नाही. पाळी आली की अजूनही मुलींना लाजविणे, शाळा सोडायला भाग पाडणे असे प्रकार घडतात.
गर्भनिरोधकाबद्दल तर चर्चा होणंच दूर, त्याचा उल्लेख केला तरी मुलींना दोष दिला जातो. परिणामी अनेक गैरसमज, भीती आणि शारीरिक-मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
समान समस्या
शहरी असो वा ग्रामीण, दोन्ही ठिकाणी मुलींना लाज, भीती आणि गुप्ततेचं ओझं सहन करावं लागतं. घरात किंवा शाळेत या विषयांवर चर्चा करणं म्हणजे जणू मोठा अपराध.
पण खरा प्रश्न असा आहे की मुलींना योग्य माहिती न दिल्यास त्या चुकीच्या मार्गावर जातात, misinformation पसरते आणि आरोग्यावर परिणाम होतो.
उपाय काय?
शाळांमध्ये औपचारिक Sex Education विषय.
शिक्षकांना योग्य training.
पालकांसाठीही जागरूकता मोहिमा.
शहरी-ग्रामीण पातळीवर स्वतंत्र sessions, खासकरून मुलींसाठी.
मुलींचा आत्मविश्वास, सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य यासाठी Sex Education अनिवार्य आहे. अन्यथा समाजात अर्धवट माहिती, भीती आणि गैरसमज कायम राहतील.