विशेष लेख कोमल वखरे
संतुलित आहार – कमी GI असलेले पदार्थ (संपूर्ण धान्य, पालेभाज्या, प्रथिने) खा. साखर, मैदा आणि जंक फूड टाळा. फायबरयुक्त पदार्थ खा आणि दिवसातून छोटी-छोटी जेवणे घ्या.
नियमित व्यायाम – दररोज 30-45 मिनिटे चालणे, धावणे, योगासने व प्राणायाम करा. यामुळे वजन आणि हार्मोन्स नियंत्रणात राहतात.
तणाव नियंत्रण – ध्यान, छंद जोपासणे आणि 7-8 तास झोप घ्या.
वैद्यकीय तपासणी – नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या.
वजन नियंत्रण – 5-10% वजन कमी झाले तरी लक्षणांमध्ये सुधारणा दिसते.
हायड्रेशन – 2-3 लिटर पाणी प्या, हर्बल टी घ्या.
वाईट सवयी टाळा – धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
सकारात्मक दृष्टिकोन – PCOD नियंत्रणात ठेवता येतो. आत्मविश्वास आणि सपोर्ट ग्रुप्सचा आधार घ्या.
योग्य आहार, व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि वैद्यकीय सल्ल्याने PCOD ची लक्षणे कमी करून निरोगी जीवन जगता येते.