कोमल वखरे विशेष लेख - संतांच्या परंपरेचा वारसाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि तोच वारसा आणि कीर्तनकार महाराज पुढे चालवत आहेत .मात्र समाज प्रबोधन करता करता राजकारण करण हे त्या कीर्तनकार भूमिकेला शोभत नाही सद्यस्थितीला अशाच एका मुद्द्यामुळे महाराष्ट्राचे तापमान वाढलं आहे ती कीर्तनकार महाराज संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून
प्रकरण झालं असं की महाराज संग्राम भंडारे यांचे संगमनेर तालुक्यामधील घुलेवाडी गावात कीर्तन सुरू होते त्याचवेळी एक व्यक्ती कीर्तनामध्ये व्यत्यय करण्याचा प्रयत्न करत होता बडबड गोंधळ घालत होता मात्र त्याचवेळी त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्याच्यासोबतच्या अजून एका व्यक्तीने आणि त्याने कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातच महाराज संग्राम भंडारे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला मात्र त्यांचा संताप हा भाषेची मर्यादा ओलांडणारा ठरला बाळासाहेब थोरात यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्या विरोधात मी आवाहन करतो अशा वृत्ती साठी आम्हालाही नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा इशारा त्यांनी दिला महाराजांच्या या अविचारी वक्तव्यावरून राज्यभरात निषेध करण्यात येत आहे आणि बॅनर्स आणि सोशल मीडिया मधून महाराज संग्राम भंडारे यांच्यावर टीका करण्यात येत आहे समाज प्रबोधक असूनही नथुराम गोडसे यांचे समर्थन करणं कितपत योग्य आहे ? समाजामध्ये कीर्तन करत असताना त्यामध्ये राजकारणाचा उल्लेख का असावा ? असे प्रश्न समाजातून महाराज संग्राम भंडारे यांना करण्यात येत आहे खरं तर संग्राम भंडारे हे हिंदुत्वाच्या आडून राजकारणाचा प्रचार सुरू असतो संतांनी कीर्तनांमधून समाजात शांतता निर्माण केली मात्र हल्लीचे कीर्तनकार महाराज यांच्या विचारांनी समाजात हिंसा घडत असेल तर हे अध्यात्म योग्य आहे का ?