🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

“काहीही झालं तरी मी 2029 ची निवडणूक लढविणार” – राहुल पाटील यांची ठाम भूमिका

कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील राजकारणाला नव्या दिशा देणारे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. “काहीही झालं तरी मी 2029 ची विधानसभा निवडणूक लढविणार” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी करवीरच्या राजकारणात नवा वेध निर्माण केला आहे.


अजित पवार यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी सडोली खालसा येथे राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेश सोहळ्यानंतर करवीरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याशी थेट सामना होणार का? नरके गटाशी काय समीकरण राहणार? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राहुल पाटील म्हणाले की “पक्ष बदलला तरी विचार बदललेला नाही. करवीरच्या जनतेने आमच्या कुटुंबावर नेहमीच प्रेम केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी 2029 मध्ये निवडणूक लढवणारच. ही माझ्या वडिलांप्रती आणि करवीरच्या जनतेप्रती असलेली जबाबदारी आहे.”


दरम्यान, करवीर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके हे पाटील कुटुंबाचे पारंपरिक विरोधक आहेत. यापूर्वीही अनेक निवडणुकांत नरके व पाटील यांच्यात थेट लढती झाल्या आहेत. राहुल पाटील यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असोत किंवा विधानसभा, आमची लढत नरके यांच्याविरोधातच राहील. कुठलीही राजकीय जुळवाजुळव होणार नाही.”


त्यामुळे 2029 मध्ये करवीरमध्ये पुन्हा एकदा पाटील विरुद्ध नरके अशी थेट टक्कर रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर राहुल पाटील यांना पक्षाकडून किती बळ मिळते आणि करवीरच्या राजकारणात ते कितपत प्रभाव निर्माण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

أحدث أقدم