कोल्हापूर :भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर काँग्रेसतर्फे आज भव्य सद्भावना दौड काढण्यात आली. या दौडीमधून स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आठवण जागविण्यात आली.
राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीजवळ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडीची सुरुवात झाली. “राजीवजी गांधी अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. दौड शहरातील शाहू समाधीपासून प्रमुख मार्गाने पुढे सरकत शेवटी राजीव गांधी पुतळ्याजवळ समाप्त झाली.
या ठिकाणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर,शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
ऋतुराज पाटील म्हणाले की, “राजीव गांधी यांचे विचार हे लोकशाही बळकट करणारे आहेत. पी. एन. पाटील यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सद्भावना दौडीसारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत.” त्यांनी पुढेही अशाच प्रकारे दरवर्षी सातत्याने आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आनंद माने, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळक्कर, सरला ताई पाटील, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, बबन रगडे, दत्ता कदम, शिरीष सोसायटी सभापती संतोष पाटील, मधुकर रगमणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसारकर, ईश्वर परमार, रियाज सुबेदार, प्रताप जाधव सरकार, रवी आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर, धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोपूजे, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दत्ता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय ममगूम, सरोजरा साळोखे, शिवानंद बनसोडे, किसनराव कुन्हाळे, भैया शेटके, काका पाटील, संजय पाटकर, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, मोहम्मद शरीफ शेख, अश्विनी शेख, दिपक थोरे, उमेश मोहिते, सचिन पाटील, सलील इनामदार, नायकडे, बी. आर. महाडीक, चंदा बेलेककर, उज्वला चौगुले, पूजा आरडे, मंगल खुळे, वैशाली जाधव,तसेच काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते.