कोमल वखरे - दिल्ली :- वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कर प्रणालीतील महत्वपूर्ण बदल करण्यासाठी राज्याच्या अर्थ मंत्र्याच्या गटाने मान्यता दिली आहे त्यानुसार आता जीएसटी मध्ये ५ टक्के आणि १८ टक्के असं दोन स्लॅब राहणार आहेत त्यामुळे अनेक करांमध्ये सुलभता येणार आहे त्यामुळेच दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होऊन त्याचा सर्वसामान्यांना अधिक फायदा होणार आहे या संदर्भातील अंतिम निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होईल बिहारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या मंत्रिगटाने हा प्रस्ताव ठेवला तर परिषदेत ७५ टक्के बहुमताने सुधारणीला मंजुरी दिली तर हा निर्णय देशभरात लागू होईल